गुलाम अलींच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध

October 7, 2015 5:02 PM0 commentsViews:

Gulam ali and shivsena

07 ऑक्टोबर : पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांच्या षण्मुखानंदमधील कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला आहे. गुलाम अलींचा 9 ऑक्टोबरला होणारा कार्यक्रम रद्द करा अन्यथा शिवसेना स्टाईल निषेध करु, अशी धमकीच शिवसेनेने दिली आहे.

शिवसेनेच्या चित्रपट शिवसेनेचे जनरल सेक्रेटरी अक्षय बर्दापूरकर आणि काही कार्यकर्त्यांनी षण्मुखानंद हॉलमध्ये जाऊन गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानी कलाकारांना देशात कुठेही काम करु देणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे.

शिवसेना पूर्वीपासूनच पाकिस्तानी कलाकार आणि क्रीडापटूंच्या विरोधात केला आहे.पाकिस्तानी कलावंतांच्या कार्यक्रमांना शिवसेनेने वेळोवेळी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलावंतांचे अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले होते. सीमेवर भारताच्या जवानांना मारणार्‍या देशाशी आम्हाला कोणतेही सांस्कृतिक संबंध ठेवायचा नाही अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. यापार्श्वभूमीवर गुलाम अली यांचा कार्यक्रमही रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close