बुलडाण्यात छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

October 7, 2015 4:32 PM1 commentViews:

ôÍûÆüŸ¯ÖÖê»ÖÖê

07 ऑक्टोबर : बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इथं दोन तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी तिने स्वत:चा एमएमएसही बनवून आरोपींना पाठवला होता.

एश्वर्या शेलगावकर असं पीडित तरुणीचं नावं होतं. ती माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत होती. शहरातील शुभम देशमुख आणि महेश रिंढे हे दोन तरूण वारंवार तिचा पाठलाग करायचे, तिची छेड काढायचे. याविषयी तिने तिच्या आईला फोन करुन सांगितलं होतं. ती घरी असताना एसएमएस आणि फोन करुन तीला बदनाम करण्याची धमकी द्यायचे यामुळे ती घाबरली होती. त्यामुळे बदनामी होईल या भीतीपोटी तिने आपल्या राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येआधी तिने गळफास घेत असल्याचा एमएमएस संबधित तरुणाला पाठवला होता.

पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी शुभम देशमुख याला पोलिसांनी अटक केली आहे तर महेश रिंढे अजूनही फरार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sudatta Patkar

    fashi dya salyana…….

close