प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांची गोळ्या झाडून आत्महत्या

October 7, 2015 6:44 PM0 commentsViews:

iasd;shduhasuihy

07 ऑक्टोबर : ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. कॉसमॉस ग्रुपचे मालक सूरज परमान हे महाराष्ट्र चेंबर ऑफ हौसिंग इंडस्ट्रीच्या (MCHI-Credai) ठाणे विभागाचे अध्यक्ष होते. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नाही. मात्र, नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूरज परमार हे आज दुपारी आपल्या सुरू असलेल्या साईटवर गेले होते. कासारवडवली इथे परमार यांची कॉसमॉस हेवन नावाच्या अपार्टमेंट सोसायटीचे काम सुरू आहे. तिथेच दुपारी ते थांबले होते. दुपारी पावनेदोन ते दोनच्या दरम्यान त्यांनी सैंपल फ्लॅटमध्ये पिस्तूलाच्या दोन गोळ्या झाडल्या. काही वेळाने साईटवरच्या कर्मचार्‍यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांना तातडीने ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. परमार यांच्या मानेत गोळी लागून मोठा रक्तस्त्राव झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.

दरम्यान, पोस्टमार्टेमसाठी त्यांचा मृतदेह जे.जे.हॉस्पीटलमध्ये नेण्यात येणार आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परमार यांची गाडी, मोबाईल, टॅब, काही पुस्तक ताब्यात घेतली आहेत. पोलिस तपास करत असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close