शिवसेनेच्या विरोधामुळे गुलाम अली यांचा मुंबईतला कार्यक्रम अखेर रद्द

October 7, 2015 10:45 PM1 commentViews:

Gulam ali and shivsena

07 ऑक्टोबर : शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतला कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. गुलाम अली हे पाकिस्तानी कलाकार असल्याने त्यांचा कार्यक्रम मुंबईत नको, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. त्यांनंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार राहुल शेवाळे आणि उस्ताद गुलाम अली खान यांच्या कार्यक्रमाचे आयोजक यांच्यात महापौर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर घेतला आयोजकांनी अखेर माघार घेत कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या 9 तारखेला गुलाम अली यांचा मुंबईतील षण्मुखानंदमध्ये कार्यक्रम होणार होता. मात्र भारत आणि पाकिस्तान सीमा घुमसत असतांना आणि पाकिस्तान सीमा भागात वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असतांना पाकिस्तानी कलाकारांना महाराष्ट्रात व्यासपीठ उपलब्ध करुन देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं मांडली.

दरम्यान, गुलाम अली यांच्या कार्यक्रमावरुन शिवसेना आणि भाजपमध्येच जुंपण्याची शक्यता होती. गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात भारताचे शेकडो जवान शहीद झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सेनेनं या कार्यक्रमाला विरोध केला आहे. मात्र या कार्यक्रमाला संरक्षण देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. पण सरकारने असं आश्वासन देऊनही शिवसेनेच्या विरोधामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aakashhiwale

    ज्यांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आहे त्यांनी पाकिस्तानात जाऊन रहावे, व ज्यांना देशाभिमान आहे त्यांनी शिवसेनेचा भूमिकेच स्वागत करावा, एवढ्या वर्षात पाकिस्तानी कलाकार इथे येतात पैसा कमावतात व जातात मग भारतीय कलाकारांना पाकिस्तानात कार्यक्रम का साजरे करून देत नाही? गेल्या काही वर्षात अंदाजे चौदा हजार भारतीय सैनिकांना पाकिस्तान चा अतिरेकी कारवाईने प्राण गमवावे लागले त्याच काय? मग पाकिस्तानी कलाकारांचा तुम्हाला एवढा पुळका कशासाठी?

close