एनएमएमटी कर्मचार्‍यांच्या संप सुरूच

January 23, 2010 1:34 PM0 commentsViews: 1

23 जानेवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बस सेवेच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचा संप अजूनही मिटलेला नाही. या संपामुळे शनिवारी दुपारनंतर ठाणे, पनवेल, उरण, कल्याणसह दहा मार्गांवरच्या बस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवरच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांचा संपाचा शनिवारचा दुसरा दिवस आहे. पण महानगरपालिका प्रशासनापैकी कोणीही या कर्मचार्‍यांना चर्चेसाठी बोलावलेलं नाही. त्यामुळे संपावर दुसर्‍या दिवशीही तोडगा निघू शकलेला नाही. नोकरीत कायम करण्याबरोबरच पगारवाढीचीही या कर्मचार्‍यांची मागणी आहे.

close