बीफ पार्टी देणार्‍या अपक्ष आमदाराला भाजप आमदारांकडून मारहाण

October 8, 2015 1:13 PM0 commentsViews:

JK Fighting

08 ऑक्टोबर : आमदार निवासात बीफ पार्टी आयोजित केल्यावरून आज जम्मू-काश्मीर विधानसभेतच हाणामारी झाली. संतप्त भाजपा आमदारांनी पार्टीचे आयोजन करणार्‍या अपक्ष आमदाराला चांगलाच चोप दिला.

जम्मू आणि काश्मीरमध्ये गोहत्या बंदी आहे. गोमांस बंदीच्या मुद्यावरून सरकारवर दबाव टाकण्यासाठी अपक्ष आमदार रशीद यांनी आमदार निवासात बीफ पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यावेळी भाजप आमदारांनी पार्टीत जावून रशीद यांना मारहाण केली होती. त्याचे तीव्र पडसाद आज विधानसभा सभागृहात उमटले. रशीद यांनी पार्टीत झालेल्या मारहाणीमुळे सभागृहात एका भाजप आमदाराच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा आमदारांनी रशीद यांना धक्काबुक्की करत चोप दिला. त्यामुळे काण सभागृहाला आखाडय़ाचे स्वरूप आले होते. दरम्यान, रशीद यांना मारहाण झाल्याने नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांनी सभागृहतून वॉकआऊट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close