मुंबईपाठोपाठ पुण्यातलाही गुलाम अलींचा कार्यक्रम रद्द

October 8, 2015 3:06 PM0 commentsViews:

gulam ali

08 ऑक्टोबर : शिवसेनेच्या विरोधानंतर प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईपाठोपाठ पुण्यातला कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच इथं 10 ऑक्टोबरला हा कार्यक्रम होणार होता. पण शिवसेनेच्या विरोधामुळेच पुण्यातलाही कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय कार्यक्रमाच्या आयोजकांनी घेतलाय.

प्रसिद्ध गझल गायक जगजितसिंग यांच्या स्मरणार्थ पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबई आणि पुण्यात कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, त्याला शिवसेनेचा विरोध केला हाता. सीमेवर पाकिस्तानी सैनिकांकडून कुरापती सुरू असताना पाकिस्तानी गायकांचा मनोरंजनाचा कार्यक्रम भारतात कशासाठी घ्यायचा, असा सवाल करत शिवसेनेने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला. त्यामुळे आधी मुंबईतला आणि त्यापाठोपाठ आता पुण्यातला ही कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे गुलाम अली व्यथीत झाले आहेत. कार्यक्रम रद्द झाल्याने चाहते नाराज झाले तसेच मलाही दुःख झाले आहे. भारतात मला प्रत्येकवेळी प्रेम मिळाले. संगीताच्या माध्यमातून सर्वांना प्रेम मिळते. त्यामुळे असे कार्यक्रम रद्द होणे दुदैवी असल्याची भावना गुलाम अली यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या विरोधामुळे मुंबईतला कार्यक्रम रद्द झालाय, त्यावर दिल्लीचे पर्यटन मंत्री कपिल मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्वीट करून त्यांनी अलींना दिल्लीत येण्याचे आमंत्रण दिले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close