कणकवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत नारायण राणेंना धक्का

October 8, 2015 3:47 PM0 commentsViews:

narayan rane

08 ऑक्टोबर : कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते नारायण राणे गटाला मोठा धक्का बसला आहे. राणेंविरोधात बंडखोरी करणार्‍या संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांची नगराध्यक्षपदी तर कन्हैया पारकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. शिवसेना-भाजपाच्या पाठिंब्यामुळे माधुरी गायकवाड आणि कन्हैया पारकर यांचा विजय सोपा झाला.

कणकवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत माधुरी गायकवाड आणि राणे गटाच्या सुविधा साटम यांच्यात लढत होती. पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांनी 9 मते मिळवित राणे गटाच्या सुविधा साटम यांचा पराभव केला. साटम यांना 8 मते मिळाली. पारकर यांच्या बंडाळीने कणकवली नगरपंचायतीवरील राणेंच्या वर्चस्वाला सुरूंग लागला आहे. विधानसभा निवडणुकीतील सलग दोन पराभव आणि आता कणकवली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या पराभवामुळे राणेंपुढील अडचणीत आणखी वाढ झाल्याचं चित्र आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close