पर्यावरण संवर्धनाचा संदेश जागवणारं वसुंधरा गीत

October 8, 2015 1:21 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर : विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करण्यात येतेय . याच वसुंधरेनं सर्वांना मातेसमान पोसलय. याचं भान सर्वांना यावं यासाठी , पुण्यातील टेरी पॉलिसी सेंटर पर्यावरण विषयक काम करणार्या संस्थेतर्फे वसुंधरा गीत लिहिण्यात आलंय याचा व्हिडीओ देखील यु ट्युबवर आहे. नेटीझन्सकडून या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हे गीत आहेत. विवेक पाटणकर यांनी मराठीत हे गीत लिहिलंय डॉक्टर विनिता आपटे यांनी हिंदीत या गीताच भाषांतर केलाय. स्वप्नील बोराडे याचं संकलन व धनश्री गणात्रा यांनी गायाल आहे. 2 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा होत असताना हे गीत पर्यावरणाविषयी संवेदना जागवणारा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close