मुंबईतील विद्यार्थी 15 ऑक्टोबरला दप्तराविना शाळेत जाणार!

October 8, 2015 4:18 PM0 commentsViews:

School wadjh

08 ऑक्टोबर : माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येत्या 15 ऑक्टोबरला मुंबईतील शाळांमध्ये ‘नो स्कूलबॅग डे’ साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे नसेल. याशिवाय राज्यभरात कलाम यांचा जन्मदिवस सवाचन प्रेरणा दिवसस म्हणून साजरा केला जाणार आहे. यात तिसरी ते सातवीच्या मुलांना अवांतर वाचनासाठी विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात वाचनाची गोडी लागावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे. या उपक्रमासाठी सहा लाख रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close