गुलाम अलींना सुरक्षा देण्यापेक्षा सीमेवर सुरक्षा वाढवा- आदित्य ठाकरे

October 8, 2015 6:29 PM1 commentViews:

aditya thakre on gulam ali

08 ऑक्टोबर : पाकिस्तानकडून सिमेवर गोळीबार सुरू असताना पाकिस्तानी कलाकारांना मुंबईत कार्यक्रम करू देणं चुकीचं असल्याचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसंच, गुलाम अलींना सुरक्षा देण्यापेक्षा सीमेवरील सुरक्षा वाढवण्याची आणी भारतीयांना सुरक्षा देण्याची गरज असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

सामनातून महागाईबद्दल मांडलेली शिवसेनेची भुमिका योग्य असल्याचं सांगतानाच जैन समाज आणि शिवसेनेच अतुट नातं आहे, हे नातं कधीही तुटणार नाही. आपल्या नात्यात कुणी आग लावायचा प्रयत्न केला तरीही हे नातं तुटणार नाही असा अप्रत्येक्ष टोला अदित्या ठाकरेंनी आशिष शेलारांना लगवाला आहे.

दरम्यान, बिहारमध्ये शिवसेना वाढते असून मी प्रचारासाठी बिहारमध्ये जाणार आहे. देशात जिथे जिथे शिवसेना वाढते आहे तिथे तिथे आम्ही ताकद देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Nilesh

    Whatever but Gulam Ali is coming to India for the programme of Legend Jagjit Singh.One has to remember this.We missed the opurtinity.This is not the correct oppose.

close