‘विको’चे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांचं निधन

October 8, 2015 11:40 AM0 commentsViews:

safsafsadf

08 ऑक्टोबर : विको म्हणजे विष्णु इंडस्ट्रिअल केमिकल कंपनीचे कंपनीचे सर्वेसर्वा गजानन पेंढारकर यांचं आज (गुरूवारी) राहत्या घरी प्रदिर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी उद्योग विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पेंढारकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. उपचारासाठी त्यांना रूग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, गुरूवारी सकाळी त्यांनी परळ इथल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

पेंढारकर यांच्या निधनाने एक प्रयोगशील उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. पेंढारकर हे 1971 पासून सलग 44 वर्ष विको उद्योगाचे अध्यक्ष होते. डोंबिवली, नागपूर आणि गोवा इथे त्यांनी विकोच्या प्रकल्पाचा विस्तार केला होता. त्यांच्या कार्यकाळात विकोची उत्पादने सातासमुद्रापार गेली. आजमितीस 40हून अधिक देशांत विकोची उत्पादने लोकप्रिय आहेत. आयुर्वेदिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यात पेंढारकर यांचा मोलाचा वाटा आहे.

गजानन पेंढारकर यांचा अल्पपरिचय

  • विको या उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा
  • विष्णू इंडस्ट्रियल केमिकल
  • कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष
  • प्रयोगशील आणि सचोटीचे उद्योगपती
  • 40 हूनअधिक देशांमध्ये विकाची उत्पादनं पोहोचवली
  • विकोच्या माध्यमातून जगभर आयुर्वेदाचा प्रसार
  • हर्बल टूथपेस्ट, टूथपावडर, टर्मरिक स्किन क्रीम, हर्बल शेव्हिंग क्रिम, आयुर्वेदिक पेन रिलीफ ही उत्पादने
  • विकोच्या उत्पादनांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवला ठसा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close