नागपूर महानगरपालिकेच्या बेपत्ता अधिका-यांचा मृतदेह मुंबईत सापडला

January 25, 2010 6:54 AM0 commentsViews: 4

25 जानेवारीनागपूर महानगरपालिकेचे बेपत्ता चौकशी अधिकारी प्रभाकर दर्भे यांचा मृतदेह मुंबईतसापडला आहे. सीएसटी स्टेशनच्या वेटिंग रुममध्ये हा मृतदेह सापडलाय. मृतदेह सध्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलाय. दर्भे गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतून बेपत्ता होते. नागपूर महानगरपालिकेचा एक चौकशी अहवाल सादर करण्यासाठी 75 वर्षांचे दर्भे शुक्रवारी मुंबईत आले. पण त्यांनतर त्यांचा घरच्यांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा राहुल दर्भे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. नागपूर महानगरपालिकेत शैक्षणिक पात्रता नसल्याच्या कारणावरून 106 कर्मचा-यांच्या बरखास्तीचा निर्णय तत्कालीन महानगरपालिका आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी दिला होता. याप्रकरणी प्रभाकर दर्भे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी तयार केलेला चौकशी अहवाल नगरविकास खात्याचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यापुढे शुक्रवारी मंत्रालयात सादर करायचा होता. यासाठी सध्याचे महानगरपालिका आयुक्त असीम गुप्ता तसंच चौकशी अधिकारी दर्भे मुंबईत दाखल झाले. पण सचिवांबरोबरच्या बैठकीला ते पोहोचू शकले नाहीत.

close