नक्षलवाद्यांनी पुकारला गडचिरोली बंद

January 25, 2010 9:11 AM0 commentsViews: 4

25 जानेवारी गडचिरोलीत नक्षलवादी कारवायांच्या विरोधात सुरू झालेल्या 'ऑपरेशन ग्रीन हंट' ला विरोध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी सोमवारीपासून 3 दिवसांचा बंद पुकारला आहे. 25 ते 27 जानेवारीदरम्यान हा बंद असेल, असं पत्रक नक्षलवाद्यांनी काढलं आहे. गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील सोमवारपासूनच गडचिरोलीच्या दौर्‍यावर आहेत. नक्षलवाद्यांचा बंद आणि मंगळवारी साजर्‍या होणार्‍या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. नक्षलवाद्यांनी काही ठिकाणी झाडे तोडून रस्त्यावर टाकली आहेत. त्यामुळं रस्ते बंद झाल्याचं समजतं.

close