पाकिस्तानी कलाकारांबाबत शिवसेनेचा दुटप्पीपणा पुन्हा उघड

October 9, 2015 8:53 AM1 commentViews:

aditya thackre
09 ऑक्टोबर : पाकिस्तानी कलाकारांच्या बाबतीतली शिवसेनेची दुटप्पी भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. पाकिस्तानी कलकार असल्यामुळे शिवसेनेने गुलाम अलींचे मुंबई आणि पुण्यातल्या कार्यक्रमांना विरोध केला. पण मुंबईत काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राहत फतेह अली खान या पाकिस्तानी कलाकाराने कला सादर केली. त्या कार्यक्रमाला मात्र आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती.

सीमेवर गोळीबार सुरू असताना आपण मजा करायची, हे कुणाही भारतीयाला सहन होणार नाही, अशी मुक्ताफळं युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी गुलाम अली यांच्या कार्यक्रमाला विरोध करताना उधळली होती. पण 20 सप्टेंबरला ताज लँड्स एन्डमध्ये एका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात राहत फतेह अली खान यांचाही कार्यक्रम झाला. अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि त्याच कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंनीही हजेरी लावली होती. नुसती हजेरीच नाही तर स्टेजवरून भाषणही केलं. मग ही मजा नव्हती का, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.

पाकिस्तानी कलाकारांना कला सादर करू न देणं हीच आमची राष्ट्रभक्ती असल्याची भूमिका सामना या शिवसेनेच्या मुखपत्राने मांडली आहे. शहीदांचा अपमान करू नका, अशा मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख छापून आला. पण स्वत: बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक पाकिस्तानी कलाकारांसोबत चांगले संबंध होते. तरीही शिवसेनेकडून वारंवार अशी दुटप्पी भूमिका घेत राहिली आहे. गुलाम अली यांच्या निमित्ताने ही दुटप्पीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Lele

    Shiv senechya hya Pappu la to pakistani hota he mahiti navhte

close