कबड्डीपटूचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटल जाळलं

January 25, 2010 9:17 AM0 commentsViews: 1

25 जानेवारी पेशंट दगावल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलला आग लावल्याचा प्रकार पेणमध्ये घडला आहे. यात 2 पोलिसही जखमी झालेत. या नातेवाईकांनी पेणमधल्या आस्था हॉस्पिटलची मोठी तोडफोड केली. कबड्डी खेळताना चमक भरल्याने हॉस्पिटलमध्ये समाधान पाटील या कबड्डीपटूला हॉस्पिटल म्ध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक संतापले आणि त्यांनी हॉस्पिटलची मोडतोड करून आग लावून दिली. या प्रकरणी पोलिसांनी 30 जणांना अटक केली आहे. या प्रकरणामुळे पेणमध्ये तणावाचं वातावरण असून राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

close