प्राध्यापकाला धमकावणार्‍या सुमीत ठाकूरला अखेर अटक

October 9, 2015 12:10 PM0 commentsViews:

adfasdfasday

09 ऑक्टोबर : प्राध्यापकांना धमकवून त्याची कार जाळणार्‍या कुख्यात गुंड सुमीत ठाकूरला नागपूर क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या धामणगावातून त्याला अटक करण्यात आली आहे.

दोन आठवड्यापूर्वी सुमीत ठाकूरने प्रा. मल्हारी म्हस्के यांना धमकावल्याचा आणि त्यांच्या गाड्यांची जाळपोळ केली होती. त्यानंतर सुमीत ठाकूर फरार होता. दरम्यान, पोलिसांनी सुमीतवर मक्का अंतर्गतही कारावई केली होती. मात्र जामिनावर तो बाहेर आला होता.

प्रा. मस्के गाडी जळीत प्रकरणानंतर पोलिसांवर सडकून टीका झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी शिर्डीतून सुमीतचा भाऊ अमितला आधीच अटक केली. त्यानंतर सुमीत ठाकूरला धामणगाव इथून अटक करण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close