चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचं शीरच केलं धडावेगळं

October 9, 2015 1:33 PM0 commentsViews:

09 ऑक्टोबर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने कुर्‍हाडीनं तिचं शीर धडावेगळं केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज परिसरात घडली आहे. इतकचं नाहीतर पत्नीचं शिर आणि कुर्‍हाड हातात घेऊन तो भारती विद्यापीठ परिसरातील रस्त्यातून चालत होता. अंगावर काटा येणार्‍या या घटनेमुळे कात्रज परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

PUNE MURDER2

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजमधल्या गंगा ओशियन या इमारतीत वॉचमन म्हणून काम करणार्‍या राम चव्हाण (वय 53) याने चारित्र्याच्या संशयावरून आज (शुक्रवारी) आपल्या पत्नीचा कुर्‍हाडीने वार करुन खून केला. एवढचं नाही तर पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर आणि कुर्‍हाड हातात घेऊन तो दिवसाढवळ्या रस्त्यावर फिरत होता. यावेळी वाहतूक पोलीसांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याच्याकडे त्याबद्दल विचारणा केली आणि त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. यानंतर लगेचच वाहतूक पोलीसांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर राम चव्हाण याला अटक करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close