नीरज ग्रोव्हर हत्येतील आरोपी मारियाला पुन्हा अटक

October 9, 2015 2:37 PM0 commentsViews:

maria-susia-630-120312

09 ऑक्टोबर : निरज ग्रोवर हत्याकांड प्रकरणात अडकलेली मारीया सुसायराज पुन्हा एकदा पोलिसांच्या तावडीत सापडलीये. पण यावेळी तिला 2 कोटी 68 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी बेड्या पडल्या आहेत.

नीरज ग्रोव्हर यांच्या हत्येच्या आरोपात 3 वर्षाची शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या मारियानं आपल्या एका मैत्रिणीसोबत एक ट्रॅव्हल्स एजन्सी सुरू केली. तिनं हजला जाणार्‍या यात्रेकरूंची तिने जवळपास 2 कोटी पेक्षा जास्त रुपयांची विमानाची तिकीटं बूक केली होती. पण ऐनवेळी ती सर्व तिकीटं रद्द करुन मरीयानं पोबारा केला. आणि त्यामुळे हज यात्रेकरुंना यात्रेलाही जाता आलं नाही. त्यामुळे तिच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी बडोदा पोलिस स्टेशनमध्ये तिच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल मारीया अहमदाबादला तिच्या वकिलाला भेटायला येणार असल्याची माहीती पोलिसांनी मिळाली आणि पोलिसांनी मारीयाला अटक केलीये.

मारिया ही एक कन्नड अभिनेत्री होती. 6 मे 2008 रोजी एका प्रॉडक्शन हाऊसचा एक्झिक्युटिव असलेल्या नीरज ग्रोव्हरची मारिया सुसायराजच्या मालाडमधील फ्लॅटमध्ये हत्या झाली होती. नीरज ग्रोव्हरची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.

मारिया सुसायराजची गुन्हेगारी पार्श्वभूमी
– नीरज ग्रोव्हर हत्याकांडामुळे चर्चेत
– टीव्ही प्रोड्युसर नीरज ग्रोव्हर हत्याकांड प्रकरणात दोषी
– पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली झाली होती 3 वर्षांची शिक्षा
– मे 2008मध्ये झाली होती नीरज ग्रोव्हरची हत्या
– मारियाचा मित्र मॅथ्यूने केला होता नीरजचा खून
– नीरजच्या शरीराचे शेकडो तुकडे करून जाळण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण खूपच गाजलं होतं.
– जुलै 2011मध्ये मारीया शिक्षा भोगून जेलबाहेर आली

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close