NMMT चे 800 कर्मचारी बडतर्फ

January 25, 2010 9:19 AM0 commentsViews: 6

25 जानेवारी 4 दिवसापासून संपावर असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका बससेवा म्हणजेच NMMTच्या 800 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आलं आहे. सोमवारी सकाळीच या कर्मचार्‍यांचं कंत्राट रद्द करण्याची नोटीस तुर्भे डेपोच्या गेटवर लावण्यात आली आहे. ज्या कर्मचार्‍यांना रोजंदारीवर काम करायचं असेल ते नवीन अर्ज भरून कामावर येऊ शकतात, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. यामुळे 800 कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. या संपामुळे NMMTच्या फक्त 40 टक्के बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कर्मचार्‍यांना काढण्याचा एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोणतीही पर्यायी व्यवस्था NMMT केलेली नाही. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या परिवहन समितीची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

close