खुशखबर, घर खरेदीसाठी बँका देणार 90 टक्के गृहकर्ज !

October 9, 2015 5:02 PM0 commentsViews:

home na09 ऑक्टोबर : जर तुम्ही घरं खरेदी करण्याच्या प्लॅन करणार असला तर थांबा…कारण, रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. यापुढे घर खरेदीसाठी बँक 90 टक्के गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहे. या अगोदरही ही मर्यादा 80 टक्के इतकी होती. मात्र, ही योजना 30 लाखांपर्यंतच्या घरांसाठीच लागू आहे.

आपल्या हक्काचं घर असावं हे सर्वांचं स्वप्न…पण हे स्वप्न साकार करतांना घर खरेदीसाठी 20 टक्क्यांसाठी पैशांची जुळवाजुळवा करतांना चांगलीच दमछाक होते. पण, आता ही दमछाक थांबणार आहे. आता घर खरेदीसाठी बँका आता 90 टक्के गृहकर्ज देणार आहेत. यासंबंधींचे आदेशच रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. त्यामुळे घर खरेदी करताना ग्राहकाला फक्त दहा टक्के रक्कम उभारावी लागणार आहे. यापूर्वी बँका 80 टक्के रक्कम द्यायच्या…आणि 20 टक्के रक्कम ग्राहकाला उभारावी लागायची. पण आता या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळालाय. मात्र ही योजना 30 लाखांपर्यंतच्या घरांसाठीच आहे. 60 लाखांपर्यंतच्या घरांसाठी 80 टक्के रक्कम उभारावी लागणारच आहे.

एका उदाहणाद्वारे याचा अर्थ बघूया

समजा 30 लाख रुपयांपर्यंत घर घ्याचं असेल तर पूर्वी बँका त्याच्या 80 टक्के गृहकर्ज द्यायची. घर खरेदी करणार्‍याला 20 टक्के रक्कम उभारावी लागायची. म्हणजे पूर्वी घर खरेदी करणार्‍याला 24 लाख कर्ज मिळायचं आणि सहा लाख रुपये त्याला स्वत:ला उभारावे लागायचे. पण आता बँक 90 टक्के गृहकर्ज देणार म्हणजे ग्राहकाला फक्त 3 लाख रुपये उभे करावे लागतील.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close