ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन यांचं निधन

October 9, 2015 5:57 PM0 commentsViews:

ravindra jain409 ऑक्टोबर : ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन यांचं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. मूत्रपिंडाच्या विकारामुळे त्रस्त असलेल्या रवींद्र जैन यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रवींद्र जैन हे जन्मत: दृष्टीहीन होते. रवींद्र जैन यांनी अपंगत्वावर मात करून चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. ‘राम तेरी गंगा मैली’,’हिना’, ‘गीत गाता चला’, ‘चोर मचाए शोर’ या गाजलेल्या चित्रपटांना रवींद्र जैन यांनी संगीत दिलं. हिंदीसोबतच त्यांनी मल्याळम, गुजराती, तेलुगू, भोजपुरी, बंगाली,उडिया, राजस्थानी भाषेतील चित्रपटांनाही संगीत दिलं. या व्यतिरिक्त त्यांनी सुप्रसिद्ध रामायण,महाभारत या मालिकांनाही संगीत दिलं होतं. 1985 मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना फिल्मफेयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. याच वर्षी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close