40 दिवसांत मराठी शिका : परप्रांतीय टॅक्सी ड्रायव्हर्सना मनसेची डेडलाईन

January 25, 2010 9:31 AM0 commentsViews: 4

25 जानेवारीपरप्रांतीय टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी 40 दिवसांची मुदत मनसेने दिली आहे. चाळीस दिवसात मराठी शिकले नाहीत तर मनसेची वाहतूक सेना आपला दणका दाखवेल, असा इशारा मनसेच्या वाहतूक सेनेने दिला आहे. अनेक टॅक्सींवर मनसेने मराठी शिकण्याच्या इशार्‍याची पत्रक लावली. तसंच मराठी बाराखडीची पुस्तकंही त्यांनी वाटली.मनसे वाहतूक सेनेचे प्रमुख हाजी अराफत शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मुंबईत हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. चाळीस दिवसांत ते मराठी शिकले नाहीत. तर चाळीस दिवसानंतर त्यांना उत्तरप्रदेशची तिकीटं वाटण्यात येतील, असा इशाराही मनसेने दिला आहे.

close