समीर गायकवाडचा ब्रेन मॅपिंग चाचणीला नकार

October 9, 2015 6:59 PM0 commentsViews:

sameer_gaikwad_pansarecase_arrest09 ऑक्टोबर : कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी आरोपी समीर गायकवाडनं ब्रेन मॅपिंग चाचणीला नकार दिलाय. तपासाला गती मिळावी यासाठी पोलिसांनी ब्रेन मॅपिंग चाचणी व्हावी अशी मागणी केली होती.

सनातनचा साधक समीर गायकवाडला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने तपासाला सहकार्य करत नसल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी समीरची ब्रेन मॅपिंग करण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. या मागणीवर आज कोर्टात सुनावणी झाली. यापुर्वीच्या सुनावणीवेळी बचावपक्षानं केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रत्यक्ष समीरच्या समोरच त्याला विचारणा करण्यात आली. कोर्टाने याबद्दल त्याला विचारणा केली. यावर समीरनं कोर्टात निवेदन देताना ब्रेन मॅपिंगला नकार दिलाय. दरम्यान, समीर गायकवाडची न्यायालयीन कोठडीही आजच संपली असता त्याच्या न्यायालयीन कोठडीत 23 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close