माझा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवा – कसाब

January 25, 2010 9:33 AM0 commentsViews: 2

25 जानेवारीमाझा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवावा अशी मागणी 26/11 चा दहशतवादी अजमल कसाब याने केली आहे. मला पाकिस्तानी अधिकार्‍यांशी चर्चा करायची आहे. पाकिस्तान सरकारने माझ्यासी संपर्क करावा, मी निर्दोष असल्याचे पुरावेही पाकमध्ये असल्याचा दावा कसाबने केला आहे. मंुबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा खटला महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. सुनावणीदरम्यान बडबड करणार्‍या आणि कोर्टाची दिशाभूल करणार्‍या कसाबला मंगळवारी कोर्टाने बोलण्यासाठी वेळ दिला होता. त्यावेळी कसाबने आपली मागणी कोर्टापुढे ठेवली. तर कसाबचा खटला सुरुच राहणार असल्याचं सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

close