नागपूर क्राईम सिटीच!,गडकरींनी खोडला मुख्यमंत्र्यांचा दावा

October 9, 2015 9:48 PM0 commentsViews:

044513nitin_gadkari09 ऑक्टोबर : नागपूरमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली असल्याची टीका सर्वत्र होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मते नागपूर ही क्राईमसिटी नाही.मात्र त्यांचाच दावा खोडून काढलाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी..स्वत:च्या अंगरक्षकाच्या पत्नीच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरांनी लुटल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

नागपूरच्या वाढत्या गुन्हेगारीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही ते म्हणाले. प्राध्यापक म्हस्के यांना धमकावल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला गुंड सुमीत ठाकूरबद्दल त्यांनी कानावर हात ठेवले. त्याला ओळखत नाही, तो पक्षात कसा आला हे माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close