ए. आर. रेहमानला ‘पद्मविभूषण’

January 25, 2010 10:25 AM0 commentsViews:

25 जानेवारीसंगीतकार ए. आर. रेहमानला पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पद्मविभूषण हा भारतातला दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारत सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या पद्म पुरस्कारांची मंगळवारी नवी दिल्ली येथे घोषणा करण्यात आली. तर आमीर खानला पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. बाळासाहेब विखे-पाटील आणि ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. विरेंद्र सेहवाग, अभिनेत्री रेखा, जोहरा सेहगल, सैफ अली खान आणि सायना नेहवाल यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं जाणार आहे. बॉक्सर विजेंदर सिंग, रेसर नरेन कार्तिकेयन, माजी सीबीआय संचालक कार्तिकेयन, डीएलएफचे के. पी. सिंग यांनाही पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

close