नाव शंभु, पण सापासोबतचे ‘माकड चाळे’ पडले महागात

October 9, 2015 10:52 PM0 commentsViews:

09 ऑक्टोबर : काही प्राणी मित्र जीव धोक्यात घालुन सापासारख्या घातक प्राण्याला ही वाचवतात, मात्र काही जण याचं प्रदर्शन करुन सापाचा आणि स्वत:चाही जीव धोक्यात घालतात. बारामती तालुक्यातील सांगवी इथ हाच प्रकार झाला.BARAMATI_SNAKE_

शंभु तावरे या सर्प मित्राने एका सापाला पकडलं…तेही नागरी वस्तीतून नाही… साप पकडतांना त्याने भलतीच मस्करी केली. महत्वाचं म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या समोर सुरू होता. त्यानंतर या सर्पमित्रानं धावत्या बाईकवर या नागाला स्वत:च्या गळ्यात टाकलं. खेळ दाखवण्याचा हा प्रकार थोड्याच वेळात त्याच्या अंगलट आला.

या सापानं त्याचा चावा घेतला. बाईकवरुन हे दोघेही खाली पडले. या सर्पमित्राला अखेर रुग्णालयात उपचार घ्यावे लागले..साप विषारी होता…मात्र वेळेत उपचार झाल्याने शंभुचा जीव वाचला. अशा सर्पमित्रावर कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close