मेट्रो कार डेपोसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्गचा पर्याय

October 10, 2015 1:44 PM0 commentsViews:

thane metro mmrda10 ऑक्टोबर : मेट्रो-3 च्या कार डेपोसाठी आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग इथल्या जागेचा पर्याय सुचवण्यात आला आहे. आरे कॉलनीसंदर्भातल्या समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलाय.

आरे कॉलनीमध्ये मेट्रोच्या कारशेडवरुन वाद निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने याचा फेरविचार करत समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून यात कांजूरमार्गचा पर्याय सुचवलाय. कांजूरमार्गचा पर्याय नसल्यास डीएमआरसीने आरे कॉलनी इथं सुधारित लेआऊटसह डबल डेकर डेपो उभारण्यासाठी सुचवलंय. आरे कॉलनीतली पर्यावरण हानी टाळण्यासाठी काही उपायसुद्धा या समितीने सुचवले आहे. या समितीत एमएमआरडीएचे आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, आयआयटी मुंबईचे प्रोफेसर डॉ. श्याम आसोलेकर आणि दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनचे संचालक एस.डी. शर्मा यांचा समावेश होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close