इंद्राणीच्या शरीरात कोकेन आढळले ?

October 10, 2015 2:01 PM0 commentsViews:

indrani10 ऑक्टोबर : शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीला मागील आठवड्यात गोळ्यांच्या अतिसेवनामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण, आता इंद्राणीच्या शरीरात कोकेन आढळून आल्याचा अहवाल एका खासगी हॉस्पिटलने दिल्यामुळे खळबळ उडालीये.

इंद्राणी मुखर्जी न्यायालयीन कोठडीत असताना बेशुद्ध झाल्यानं तिला काही दिवसांपूरर्वी जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. इंद्राणीच्या शरीरात कोकेन आणि अफू सापडल्याचा अहवाल आता एका खाजगी रुग्णालयानं दिलाय. इंद्राणीच्या युरिन रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला आहे. मात्र, आपण अंमली पदार्थाचं सेवन केला नसल्याचा दावा इंद्राणींनं केला होता.तिला 6 ऑक्टोबरला डिस्चार्ज देण्यात आला. कोठडीत असतानाही इंद्राणी अचानक बेशुद्ध कशी झाली या प्रकरणी तपास सुरू आहे.

पण, कोकन घेतल्याचं अहवालातून समोर आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. कोठडीत असताना इंद्राणीने कोकन कुठून घेतलं ?, कोठडीत कोकनने कुणी पुरवलं असे सवाल आता उपस्थित झाले आहे.

तसंच जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असतांना ही बाब समोर का आली नाही असा सवालही उपस्थित होत आहे. यावर पोलीस प्रशासन आणि जेजे हॉस्पिटलकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close