रेल्वे मोटरमनचा संप मागे

January 25, 2010 1:49 PM0 commentsViews: 2

25 जानेवारी मुंबईत मंगळवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मोटरमनचा होणारा प्रस्तावित संप मागे घेण्यात आला आहे. मोटरमनचे ग्रेडनुसार असलेले पगार चार हजार दोनशे वरुन, चार हजार आठशे रुपये करावेत या मागणीसाठी हा संप होणार होता. मात्र, रेल्वे प्रशासन आणि मोटरमन संघटनेत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी मोटरमन संपावर जाणार होते. मात्र रेल्वे प्रशासन आणि मोटरमन संघटनांमध्ये शिवसेनेच्या मोहन रावले यांनी मध्यस्ती करून अधिकार्‍यांकडून त्यांच्या मागण्याबाबत आश्वासन मिळवल्याने मोटरमन संघटनेने आपला संप मागे घेतला आहे. हा संप मागे घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. 1 मे पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा मोटरमन संघटननेने दिला आहे.

close