कल्याण-डोंबिवली निवडणुकीत सेना-भाजप युतीवरुन संभ्रम कायम

October 10, 2015 2:27 PM0 commentsViews:

sena bjp kdmc10 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही याबाबत चर्चा रंगतेय. याबाबत मात्र अजूनही संभ्रम कायम आहे.

एकीकडे कल्याण-डोंबिवलीचे भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपनं सेनेशी युती करू नये अशी मागणी करतायत. मात्र दुसरीकडे युती करण्याबाबत सेना आणि भाजपमध्ये चर्चा होतेय.

युतीबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे काही नेते वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यामुळं भाजप शिवसेनेशी हातमिळवणी करून निवडणूक लढणार की निकालांनंतर हे दोन पक्ष एकत्र येणार, याबद्दल उत्सुकता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close