आर.आर. पाटील यांच्या हस्ते गडचिरोलीत ध्वजारोहण

January 26, 2010 8:46 AM0 commentsViews: 1

26 जानेवारी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पाश्‍र्वभूमीवर गडचिरोलीमध्ये गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद स्वत:हून मागून घेणारे आर.आर. पाटील सोमवारपासूनच गडचिरोलीत आहेत. नक्षलवाद्यांच्या धमक्या आणि बंदला न जुमानता गृहमंत्र्यांनी प्रत्युत्तर देत गडचिरोलीमध्ये ध्वजारोहण केलं. एखाद्या गृहमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी पोलिसांनी जोरदार सलामी देत, तिरंग्याला अभिवादन केलं. खुद्द गृहमंत्री ध्वजारोहणाला आले असल्याने गडचिरोलीच्या नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. दरम्यान, ध्वजारोहणानंतर दोन मुलींसह 6 नक्षलवाद्यांनी गृहमंत्र्यांपुढे आत्मसमर्पण केलं. आर.आर. पाटील यांनी या नक्षलवाद्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

close