पुण्यात गुंडांचा धुडगूस ; वाहनं, दुकानांची तोडफोड

October 10, 2015 2:58 PM0 commentsViews:

bhosari 410 ऑक्टोबर : पुण्यातील भोसरी भागातील संत तुकारामनगरमध्ये मध्यरात्री 50-60 जणांच्या टोळक्याने रस्त्यांवरील वाहनांची अंदाधुंद तोडफोड केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय.

या तोडफोडीत जवळपास 20-25 दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं नुकसान झालंय. तर दोन दुकानांचंही नुकसान झालंय. लाठ्या काठ्या, शस्त्र घेऊन या गुंडांनी अक्षरश: रस्तावर धुडगूस घातला होता.

टोळक्याच्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. स्थानिक गुंडाच्या भांडणातून ही तोडफोड झाली असावी. असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी अजूनही कुणाला ताब्यात घेण्यात आलं नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close