2019 पर्यंत दंगली घडतील, युद्धही घडवलं जाईल -राज ठाकरे

October 10, 2015 3:36 PM0 commentsViews:

raj thackaey pc10 ऑक्टोबर : दादरी हत्याकांड घडले आणि त्यांनंतर उसळलेला जनक्षोम मुळात हे सगळं ठरवून चाललंय. पुढे नजीकच्या काळात म्हणजे 2019 पर्यंत दंगली घडवल्या जातील, कदाचित एखादं युद्धही घडवलं जाईल असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरेंनी डोंबिवलीमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी चौफेर तोफ डागली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केल्यानंतर जोरदार हल्लाबोल सुरू केला. आज डोंबिवलीत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. दादरी प्रकरणाचा उल्लेख करत येणार्‍या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली. 2019 पर्यंत दंगली आणि युद्धही घडवलं जाईल. आता जे काही सगळं सुरू आहे ते सत्तेवर येण्यासाठी पायभरणी आहे असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

…मग कॅम्पाकोलाला वेगळा न्याय का ?

नवी मुंबईत दिघा परिसरात अनधिकृत इमारतींवर पालिकेनं कारवाई करण्यात आलीय. यावेळी राज ठाकरेंनी दिघा परिसरातील नागरिकांची बाजू घेतली. मुळात तिथेल रहिवाशांना फसवलं गेलं. या प्रकरणी बिल्डर्स, नगरसेवक, आमदारांवर कारवाई करण्यात आली नाही. उलट जनतेवर कारवाई करण्यात आली. त्यांना रस्त्यावर आणलं गेलं. एकीकडे कॅम्पाकोलावर कारवाई होत नाही आणि दुसरीकडे ही कारवाई केली जाते. एकाच राज्यात दोन वेगवेगळे न्याय कसे ? असा सवाल राज यांनी उपस्थित केला.

‘पाक कलाकारांना विरोध झालाच पाहिजे’

मी कुठल्या कलेच्या किंवा कलाकारांच्या विरोधात नाही. परंतु ज्या प्रकारे आपल्या कलाकारांना पाकिस्तानात वागणूक मिळते. एवढंच काय तिकडे बोलावलंही जात नाही. लतादीदींचा तर तिकडे कार्यक्रमही होऊ दिला नव्हता. जरीही जुणी गोष्ट असली तरी आजही हेच घडतं आहे. आपल्याकडे इतके चांगले कलाकार असतांना पाकिस्तानी कलाकारांना कशाला बोलावताय. प्रत्येक वेळा ती लोकं ताणणार आणि आमचा ‘गेट ऑफ इंडिया’ कुणी या आणि कुणी जा..असं नाही होऊ शकतं. हिंदी चित्रपटीसृष्टी अनेक पाकिस्तानी कलाकार आहे त्यांनाही विरोध झाला पाहिजे असं सांगत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close