वाळूमाफियांच्या त्रासाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

January 26, 2010 8:50 AM0 commentsViews: 1

26 जानेवारी वाळूमाफियांच्या त्रासाला कंटाळून यवतमाळमध्ये एका शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या केली. अजित चाँदखाँ फारुखी असं या शेतकर्‍याचं नाव आहे. या शेतकर्‍याच्या शेतीतून सर्रास वाळूचे ट्रक नेले जातात, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय. याबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अखेर या त्रासाला कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केली. या शेतकर्‍याची जमीन नांदेड आणि यवतमाळ जिल्हाच्या सीमेवर आहे. नांदेड प्रशासकीय अधिकार्‍यांनी प्रतिसाद दिला नाही. यवतमाळला तक्रार करायला सांगितली. अनेकांना निवेदन देऊनही दखल न घेतल्याने शेवटी या शेतकर्‍याने विष प्राशन केलं.

close