स्वतंत्र विदर्भासाठी काँग्रेस हायकमांडची तयारी नाही – वसंत साठे

January 26, 2010 8:51 AM0 commentsViews: 2

26 जानेवारी विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्रातली सत्ता जाईल याची काँग्रेस हायकमांडला भीती वाटत असल्याने वेगळ्या विदर्भाबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही, असं मतं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत साठे यांनी आयबीएन-लोकमतकडे मांडलं आहे. स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर विदर्भातले काँग्रेसचे नेते दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. तेलंगणा प्रश्न सोडवल्यानंतर स्वतंत्र विदर्भाचा नक्की विचार करू, असं आश्वासन 2004मध्ये आम्हाला हायकमांडने दिलं होतं. आता ते त्यांनी पूर्ण करावं, अशी मागणी वसंत साठे यांनी 'आयबीएन-लोकमत'च्या माध्यमातून केली आहे. त्याचीच आम्ही हायकमांडला आठवण करून देत आहोत असंही साठे पुढे म्हणाले.

close