स्मारकाच्या भूमिपूजनावरून दानवे-कदम यांच्यात खडाजंगी

October 10, 2015 8:40 PM0 commentsViews:

10 ऑक्टोबर : इंदू मिलमध्ये होणारं बाबासाहेब आबेडकर यांच्या स्मारकाचं भूमिपूजन उद्यावर येऊन ठेपलंय. मात्र, सेना भाजपमधलं मानापमान नाट्य काही संपत नाहीये. ज्यांना बाबासाहेबांविषयी प्रेम आहे त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावं असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला. तसंच मानपमान बाजूला ठेवून इंदू मिलच्या कार्यक्रमात यावं असा सल्लाही दानवेंनी दिला.

danve kadamदानवेंच्या टीकेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं. आम्हाला बाबासाहेबांच्या प्रेमाबद्दल कुणी शिकवू नये अशा शब्दातच कदम यांनी भाजपला सुनावलंय. 20 वर्षांपूर्वी माझ्या मतदारसंघात मी बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा उभारला. भाजप आता इंदू मिलमध्ये उभारत आहे. असा टोलाही त्यांनी लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close