केडीएमसीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, 56-41चा फॉर्म्युला !

October 10, 2015 9:43 PM0 commentsViews:

congress NCP10 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. मात्र, चार जागांवर अद्यापही निर्णय झालेला नाहीय.

नुकतीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसला 56, राष्ट्रवादीला 41 आणि 4 ठिकाणी मैञी पूर्ण लढाई असा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. माञ, 4 प्रभागांवरती दोन्ही काँग्रेसनी दावा केलाय. त्यावर उद्या चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मिळतेय. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून बाजी मारलीये. पण, पालिकांच्या आखाड्यात याचा किती फायदा होईल हे पाहावं लागेल.य

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close