पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

October 11, 2015 4:51 PM0 commentsViews:

ajasdhjhasd

11 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या मुंबई दौर्‍यातील सर्व कार्यक्रमांवर शिवसेनेने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मोदीच्या कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या मुंबई भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमधले मतभेद पुन्हा एकादा उघड आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डॉ. आंबेडकर स्मारक आणि मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. या कार्यक्रमाचा मुहूर्त आधीच निश्चित झाला असतानाही भाजपाकडून राज्य सरकारमधल्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला कोणतेही आमंत्रणं देण्यात आलं नाही. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी शिवसेनेला आमंत्रणं ई-मेलवरून पाठवण्यात आलं. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात भाजपाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे शिवसेनेनेही भाजपला जशाच तसं उत्तर देण्याचं ठरवलं असून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा पदाधिकाऱयाने मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं समजते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह बहुतांश मंत्री आज सकाळीच शेतकरी मेळाव्यासाठी बीडला रवाना झाले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close