मोनोरेलची चाचणी यशस्वी

January 26, 2010 8:54 AM0 commentsViews: 2

26 जानेवारी मुंबईत प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून मोनोरेलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण स्वत: या ठिकाणी उपस्थित होते. मुंबईची ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी लवकरच मुंबईकरांच्या दिमतीला मोनोरेल सुरू होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी मोनोरेलची यशस्वी चाचणी झाली. याचा दीडशे मीटरचा ट्रॅक तयार असून मंगळवारी मोनोरेल 75 मीटर इतकी धावली. 2011 पर्यंत ही मोनोरेल मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.

close