…तर सीईटीतून काढून टाकू – शिक्षणमंत्र्यांची धमकी

January 26, 2010 10:56 AM0 commentsViews:

26 जानेवारीआंदोलन कराल तर सीईटीतून काढून टाकू अशी धमकी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांना दिली आहे. ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लातूरमध्ये ही घटना घडली. सीमावर्ती भागातल्या डी. एड. च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी शिक्षणमंत्र्यांची गाडी अडवली होती. आंदोलक विद्यार्थी कर्नाटकात डी. एड. करतात म्हणून त्यांना सीईटीतून वगळण्यात आलं आहे. हीच मागणी घेऊन विद्यार्थ्यार्ंनी आंदोलन केलं. यावेळी थोरात ध्वजारोहण करून परतत होते. त्यावेळी त्यांची गाडी विद्यार्थ्यांनी अडवली, याचा शिक्षणमंत्र्यांना प्रचंड राग आला. आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना असं आंदोलन कराल तर सीईटीतूनच काढून टाकण्याची धमकी विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांना माफीही मागण्यास भाग पाडलं.

close