नव्याने भरती झालेल्या पोलीस अधिकार्‍यांना नक्षलग्रस्त भागात काम करावंच लागेल – आर. आर. पाटील

January 26, 2010 10:58 AM0 commentsViews: 1

26 जानेवारी सरकारी सेवेत नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधिकार्‍यांना एकदा तरी नक्षलग्रस्त भागात काम करावंच लागेल, अशी महत्व पुर्ण घोषणा प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गडचिरोलीत केली आहे. नक्षलग्रस्त क्षेत्रांत काम करायला नवीन पोलीस अधिकारी तयार होत नाहीत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गडचिरोलीतील शासकीय पदं रिकामी आहेत. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं आर. आर. पाटील यांनी सांगितलं.