गडकरी, फडणवीस आणि प्रभूंचं पंतप्रधानांनी केलं कौतुक

October 11, 2015 10:18 PM0 commentsViews:

ssdasudhasu

11 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं तोंडभरुन कौतूक केलं. 10 वर्षात जे झाल नाही ते गडकरींनी 15 महिन्यात करुन दाखवल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोचे काम मार्गी लावतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज रविवारी बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं आणि मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजन केलं. त्यानंतर बीकेसी मैदानावर घेतलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

बंदरांच्या विकासात गेल्या 10 वर्षात सरकारने जे केलं नाही ते गडकरींनी 15 महिन्यात करुन दाखवलं. गडकरी हे वेगावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सध्या प्रतिदिन 15 किलोमीटरचे रस्ते तयार होतात असा दावा मोदींनी केला. तर मेट्रो प्रकल्पासाठी डीपीआर तयार करण्याचे काम फडणवीस यांनी चार महिन्यांत पूर्ण केलं. तसंच जलयुक्त शिवार योजनेसाठीही त्यांचं कौतुक केलं पाहिजे असं मोदींनी नमूद केलं. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचे कामकाजही चांगले सुरू असल्याचं सांगत मोदींनी प्रभूंचंही कौतुक केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close