बाबासाहेब नसते तर आज मी ही नसतो – मोदी

October 11, 2015 10:31 PM0 commentsViews:

11 ऑक्टोबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त दलितांचे नेते ठरवले तर हा त्यांचा अवमान आहे. आंबेडकर हे एका समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. बाबासाहेब नसते तर आज मोदीही नसते असे भावनिक विधानही त्यांनी केलं आहे.

मुंबईत इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनानंतर बीकेसीतल्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभा घेतली. आज जगाला मार्टिन ल्युथरकिंग माहित आहेत पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जगाला माहित नाही हे आपलेच दुदैवी आहे. बाबासाहेब अत्यंत कठीण स्थितीतून पुढे आले पण त्यांच्यात कटुता कधीही नव्हती असं मोदींनी सांगितलं.

sfasfasfaspy

आमच्याविरोधात भीती पसरवणं बंद करा

देशात भाजपाची सत्ता आली की आरक्षणाविरोधात भीती पसरवली जाते. भाजपा आली म्हणजे आरक्षण जाणार अशी भीती समाजाला दाखवली जाते. ही खोटी माहिती पसरवून राजकारण करण्याचे उद्योग बंद झाले पाहिजे असे मोदींनी विरोधकांना सुनावले आहे.

आंबडवे गावाचा विकास

भाजप सरकार जेव्हाही सत्तेत येत तेव्हा बाबासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागतो असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला. 25 वर्षे फाईलमध्ये अडकलेला दिल्लीतल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचा मार्ग आम्ही मोकळा केला. 300 कोटी खर्चून स्मारक तयार होत असल्याची माहिती त्यांनी दिली. महत्वात म्हणजे रत्नागिरी जिल्हातील बाबासाहेबांचं आंबडवे गावाचा विकासाच काम आम्ही हातात घेतल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

26 नोव्हेंबर ‘संविधान दिन’

तसंच 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा मोदींनी केली. यामुळं लोकांना बाबासाहेबांनी केलेल्या निर्मितीचं महत्व कळण्यास मदत होईल असं पंतप्रधानांनी म्हटलं.

स्मारकात लोकसहभाग हवा

इंदू मिलमधील आंबेडकर यांच्या स्मारकासाठी लोकसहभाग असायला हवा. महाराष्ट्रात 40 हजार गाव आहेत, या प्रत्येक गावाने स्मारकाच्या परिसरात एक रोपटं लावावे आणि 11 हजार रुपये द्यावे असे आवाहन मोदींनी केले आहे. यामुळे स्मारकाचे चित्रच बदलेल असे त्यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close