बीटी वांग्याला विरोध करण्यासाठी जयराम रमेश यांना घेराव

January 27, 2010 8:31 AM0 commentsViews: 1

27 जानेवारी बीटी वांग्याला विरोध करण्यासाठी पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांना बुधवारी नागपुरात पर्यावरणवाद्यांनी घेराव घातला. बीटी वांग्यावर होणार्‍या 'जनसुनवाई'त हजर राहण्यासाठी पर्यावरणमंत्री नागपुरात आले होते. पण परिषदेत जाण्यापूर्वीच पर्यावरणवादी आणि स्वदेशी जागरण मंच या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. आणि बीटी ब्रिंजलला विरोध दर्शवला. यावेळी विदेशी बियाणे कंपनीच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर दुसरीकडे या आंदोलनाला विरोध करण्यासाठी आणि बीटी वांग्याचं समर्थन करण्यासाठी शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरली होती. संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं. बीटी उत्पादनं शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला उपयुक्त आहेत, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

close