सुधींद्र कुलकर्णींवरील पेंटहल्ला ही सौम्य प्रतिक्रिया – संजय राऊत

October 12, 2015 12:44 PM0 commentsViews:

12 ऑक्टोबर : सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळं फासण्याच्या कृत्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. संतापलेल्या लोकांची ही सौम्य प्रतिक्रिया आहे. ही शाई नसून भारतीय जवानांचे रक्त आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर अशाप्रकारे पेंटहल्ला करणार्‍यांना संजय राऊत यांनी राष्ट्रभक्त म्हटलं आहे.

sanjay raut

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजन करणार्‍या सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला आज काळं फासण्यात आलं. शिवसेना कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचं कुलकर्णीनी यांचं म्हणणं आहे. ते पेंट होतं की डांबर हे आपल्याला माहीत नाही. पण पाकचं लांगुलचालन करणार्‍यांविरोधातला हा संताप आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

आमच्या जवानांचे व निरपराध नागरिकांचे रक्त बघून तुमचे रक्त खवळत नाही, पण शाई बघून तुम्ही चिडता, असा टोलाही त्यांनी कुलकर्णी यांना लगावला. जोपर्यंत पाकिस्तान काश्मीरमध्ये अस्थितरता निर्माण करून जवानांची हत्या घडवून आणेल तोपर्यंत आमचा पाकिस्तानला विरोध कायम राहिल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close