मिरपूर टेस्ट भारतानं जिंकली

January 27, 2010 8:38 AM0 commentsViews: 2

27 जानेवारी मिरपूर टेस्टमध्ये बांगलादेशचा पराभव करत टीम इंडियानं ही टेस्ट सीरिजही 2-0 ने खिशात टाकली आहे. टेस्टच्या चौथ्या दिवशी लंचनंतर लगेचच भारताने विजयावर शिक्कामोर्तब केलं. तामिम इक्बाल आणि जुनैद सिद्दिकीच्या बॅटिंगमुळे बांगलादेशने इनिंगचा पराभव मात्र टाळला. त्यांची दुसरी इनिंग 312 रन्समध्ये आटोपली. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त 2 रन्सचं आव्हान त्यांनी ठेवलं. लंचनंतर पहिल्याच ओव्हरमध्ये हे लक्ष्य भारतीय टीमने पूर्ण केलं. आणि विजय साकारला. बुधवारी सकाळी शहादत हुसैन आणि मोहम्मद अश्रफ्फुल यांनी बांगलादेशची दुसरी इनिंग लांबवली. पण हे दोघं लागोपाठ आऊट झाले. आणि त्यानंतर झहीर खानने तळाची बॅटिंग लाईन अप झटपट गुंडाळली. झहीरने दुसर्‍या इनिंगमध्ये 87 रन्समध्ये 7 विकेट घेतल्या. तर मॅचमध्ये त्याने 10 विकेट घेण्याचा पराक्रमही केला. त्यालाच मॅच ऑफ द मॅच तसंच मॅन ऑफ द सीरिजचा किताब देण्यात आला.या सीरिजमध्ये झहीरने दोन टेस्टमध्ये एकूण 15 विकेट्स घेतल्या.

close