कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाचा नियोजित कार्यक्रम होणारच- सुधींद्र कुलकर्णी

October 12, 2015 2:53 PM0 commentsViews:

Ë×êÖêËêÖêËÖê

12 ऑक्टोबर : शिवसेनेने पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला असतानाही, कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा नियोजित कार्यक्रम होणारचं, असं म्हणत सुधींद्र कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेतचं कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाची औपचारिकता पूर्ण केली.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक आज संध्याकाळीप्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध असून सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर पेंट हल्ला केला. या घटनेमागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. या घटनेनंतर कुलकर्णी आणि कसुरी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेने माझा नव्हे तर तिरंग्याचा अपमान केला आहे असा आरोपही त्यांनी केला. कार्यक्रम रद्द झाल्यास आमचा पराभव होईल आणि आम्हाला पराभूत व्हायचे नाही, हा कार्यक्रम होणारच असे त्यांनी ठणकावून सांगितलं.

तर सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांनीही निषेध व्यक्त केला आहे. मी राजकीय कार्यकर्ता आहे, राजकीय विरोध समजू शकतो पण तो शांततेच्या मार्गानेच व्हायला हवा असं कसुरी यांनी नमूद केलं आहे. माझे वडिल मुंबईत शिकले, मुंबईशी माझे संबंध असून मी लढण्यासाठी नव्हे तर शांततेचा संदेश घेऊन मुंबईत आलो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही देशांमधील गैरसमज दूर करण्याची गरज आहे, पाकिस्तानमधील सर्वसामान्यांना भारतासोबत चांगले संबंध असावे असं वाटतं. जनतेच्या मनात विष नसते, पण नेतेच लोकांच्या मनात विष पसरवतात असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

दरम्यान, 26/11 हल्ल्याचा जो खटला पाकिस्तानात सुरू आहे, तो अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे आणि या कटाचा मास्टरमाईंड जमात-उद-दावाचा मोर्‍हक्या आफीज सईद मोकाट आहे,यावर उत्तर देताना. पाकिस्तानात न्यायव्यवस्थेवर प्रचंड दबाव असल्याचं ते म्हणाले. पण आता पाकिस्तानातही कायदे बदललेत आणि या खटल्याला गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच हाफीज सईदला पाकिस्तान सरकारने नाही तर कोर्टाने पुराव्यांअभावी सोडल्याचं ते म्हणाले. 26/11 चा हल्ला हा दुदैर्वी होता, असंही ते म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close