भाजपचा सेनेला डच्चू, रिपाइंसोबत युती ?

October 12, 2015 3:56 PM0 commentsViews:

fadanvis on athavale12 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवलीच्या आखाड्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार की नाही हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण, भाजपने आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला असून रामदास आठवले यांच्या रिपाइंसोबत युती करण्याचं जवळपास निश्चित झालंय.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप सेनेसोबत युती करणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. भाजप स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार आहे. निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपाइंला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय काल रविवारी झालेल्या बैठकीत जवळपास निश्चित करण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे,खासदार कपिल पाटील आणि कल्याण डोंबिवलीचे भाजपचे आमदार उपस्थित होते.122 जागांपैकी 6 जागा रिपाइंला देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close